A person was arrested for demanding a bribe of 400 | शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी एकास अटक -NNL

लातूर| तक्रारदार यांच्याकडून आरोपी जयप्रकाश बालाजी बिराजदार, वय 45 वर्षे, पद प्रयोगशाळा सहायक, वर्ग-3, नेमणूक पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर यांनी तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी म्हणून 400/- रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.16/07/2024लाच स्वीकृती व हस्तगत करताना रंगेहात पकडले आहे. लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन 2012-13 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर मध्ये शिक्षण घेत होती. सन 2013 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता, म्हणून तिचा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबतचा विनंती अर्ज तक्रारदार (विद्यार्थिनीचा सख्खा भाऊ) याने दि. 08/07/2024 रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता.

तक्रारदार यांनी दि.12/07/2024 रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता आरोपी जयप्रकाश बालाजी बिराजदार, वय 45 वर्षे, पद प्रयोगशाळा सहायक, वर्ग-3, नेमणूक पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर, रा.विकास नगर, देगलूर रोड, उदगीर ता.उदगीर जि.लातूर यांनी 400 रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली. त्यावरून सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली.

त्यावरून आज दि.16/07/2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी बिराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 400/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर येथील कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे. आरोपी लोकसेवकास सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह रांगेहात पकडले. आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन देवणी, जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

सादर कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र (मो.नं. 9623999944) पर्यवेक्षण अधिकारी श्री संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
(मो.नं. 7744812535) यांच्या मार्गदर्शनावाखाली सापळा पथकाही टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांनी केली.

या कार्यवाहीस लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलूचपत प्रतीबंधक विभागाकडून आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँटी करप्शन ब्यूरो, लातूर, दुरध्वनी क्रमांक 02382-242674 टोल फ्रि क्र. 1064श्री संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक, (मो.नं. 7744812535)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button