Homeनांदेडपोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

नांदेड | नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने नांदेड शहर आणि लातूर जिल्ह्यातील देगलूर भागात धाड टाकत मटका अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत ९४ हजार ७६० रुपयांची रोख रक्कम, १६ मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण २ लाख ७३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर चौकातील काळे कॉम्प्लेक्स व मंगळातील बाळाजी चौक येथे सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६९,४६० रुपयांची रोख रक्कम व सात मोबाईल जप्त करण्यात आले असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
तसेच १० मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील देगलूर शहरातील बसस्थानक परिसर, धोत्रे कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट व बारोळे चौक येथे ऑनलाइन लॉटरी मटका बुकीवर छापे टाकण्यात आले.

या कारवाईत २५,३०० रुपयांची रोख रक्कम, ४५ हजार रुपयांचे नऊ मोबाईल व ६१,७०० रुपयांची पावती पुस्तके जप्त करण्यात आली असून १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन्ही कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक फक्कन इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खन्नासे, गणेश झुमके व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

तसेच परिसरात अवैध व्यवसायांची माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments