Sunday, June 28

Tag: Action by a team of Deputy Inspector General of Police; Raids on Matka bases in Nanded and Degalur

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

नांदेड, क्राईम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने नांदेड शहर आणि लातूर जिल्ह्यातील देगलूर भागात धाड टाकत मटका अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत ९४ हजार ७६० रुपयांची रोख रक्कम, १६ मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण २ लाख ७३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर चौकातील काळे कॉम्प्लेक्स व मंगळातील बाळाजी चौक येथे सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६९,४६० रुपयांची रोख रक्कम व सात मोबाईल जप्त करण्यात आले असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच १० मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील देगलूर शहरातील बसस्थानक परिसर, धोत्रे कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट व बारोळे चौक येथे ऑनलाइन लॉटरी मटका बुक...
error: Content is protected !!