SRTMU Volleyball ; यजमान ‘स्वारातीम’ नांदेड विद्यापीठाची आगेकूच; पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा – NNL

नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान नांदेड विद्यापीठाच्या संघाने आनंद कृषी विद्यापीठ, आनंद चा ३-० ने धुवा उडवत आगेकूच केली आहे.

दि. १४ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत ११८ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला आहे. इनडोअर व आउटडोअर मैदानावर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरातच्या सकलचंद पटेल विद्यापीठाने जयपूरच्या विवेकानंद विद्यापीठाचा ३-० ने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अहमदाबादच्या सिल्वरओक विद्यापीठाने कोटा विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. वडोदरा परोल विद्यापीठाने बुंदेलखंड विद्यापीठाचा ३-० असा पराभव केला. वडोदरा विद्यापीठाने जयपूर विद्यापीठाचा, राजकोटच्या मारवाडी विद्यापीठाने पिंदवाडा विद्यापीठाचा ३-० ने पराभव केला. गोवा विद्यापीठाने भोपाळच्या जगरान विद्यापीठाचा एकतर्फी धुव्वा उडविला. भोपाळच्या राजीव गांधी विद्यापीठ, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने तसेच वाफीच्या राजीव श्रॉफ विद्यापीठाने प्रतिस्पर्धीवर मात करत आगेकूच सुरू ठेवली आहे.

इनडोअर मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने देवी अहिल्या विद्यापीठ इंदोरचा ३-१ ने पराभव केला. चुरशीच्या सामन्यात सरदार पटेल विद्यापीठाने उदयपूरच्या भोपाल विद्यापीठाचा व रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भूपालने राजऋषी मत्स्य विद्यापीठ अलवारचा ३-२ ने प्रभाव केला. गुजरात टेक्निकल विद्यापीठ अहमदाबाद, बालाजी विद्यापीठ पुणे व गुजरातच्या चारोधर विद्यापीठाने प्रतिस्पर्धीवर मात करत दुसरी फेरी गाठली आहे.

राजकोटच्या सौराष्ट्र विद्यापीठाने अहमदाबादच्या सिल्वरओक विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. वरोदरा परोल विद्यापीठ, अजमेरच्या महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ व गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने पुढील फेरी गाठली आहे. पुणेच्या बालाजी विद्यापीठाने जोधपुर विद्यापीठाचा, गोधरा येथील गोविंद गुरु विद्यापीठाने सरदार पटेल विद्यापीठाचा सरळ ३-० ने पराभव केला. यासह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एमआयटी पुणे व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या संघांनीही पुढील फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.

सामान्यांचे थेट प्रक्षेपण……… ए.बी.सी.व डी. अशा चार गटात या स्पर्धा होत असून पाच राज्यातील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. इनडोअर मैदानातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण यू-ट्यूब च्या माध्यमातून क्रीडा रसिकांसाठी केले जात आहे. इनडोअर व आऊटडोअर मैदानावर तुल्यबळ लढती होत असून स्पर्धा नॉकऑउट पद्धतीने सुरू आहेत.

या स्पर्धेसाठी पंचप्रमुख पी.एस.पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे पंच तसेच क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, अंजली पाटील, विक्रम कुंटूरवार, राजकुमार दहीहंडे, नारायण उपलंचवार, विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, सुधीर दापके आदी परिश्रम घेत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button