Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी; सुरक्षित व सुव्यवस्थित नियोजनावर भर

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | महाशिवरात्री निमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या आगामी काळात होणाऱ्या यात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीनंतर, मनोरंजन, खेळणी विभागासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ तसेच यात्रा काळात सक्रिय योगदान देणाऱ्या युवकांच्या नेतृत्वाखाली दि. 2 जानेवारी (शुक्रवार) रोजी करण्यात आली.

यात्रेचा आनंद घेताना महिला, पुरुष नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बालगोपाळांना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच यात्रेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने चारही बाजूंनी योग्य सुरक्षा व्यवस्था राहावी व कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, या उद्देशाने संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी गंगाधर सावकार यांच्या मालकीच्या खुल्या मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य नियोजन आखण्यात आले.

oplus_0

यावेळी मैदानाची स्वच्छता, ओबडधोबड रस्ते सुरळीत करण्याचे काम, तसेच बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यात्रेदरम्यान व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, नागरिकांची ये-जा सुरळीत राहावी आणि मनोरंजन विभाग सुरक्षित व आकर्षक पद्धतीने उभारता यावा, यासाठी उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

oplus_0

या पाहणीप्रसंगी संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, मारोती हेंद्रे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, उदय देशपांडे, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, शिवसेना शहराध्यक्ष गजानन हार्डफकर, पापा पार्डीकर, विकास नरवाडे, बालाजी ढोणे, संतोष बंजेवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित, आनंददायी व सुव्यवस्थित वातावरण मिळावे, या हेतूने नियोजनाला गती देण्यात येत असून, श्री परमेश्वर यात्रेची जय्यत तयारी सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button