हिमायतनगर| येथील प्रसिद्ध व्यापारी हाजी सय्यद अब्दुल गफुर सेठ (Abdul Gafur Seth passed away) यांच आज सायंकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने व्यापार क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता दफनविधी केला जाणार आहे.

सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध भुसार व्यापारी सय्यद अब्दुल गफुर भाई सय्यद अल्लाबकश सौदागर यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रात्री ठेवण्यात येईल असे सांणगण्यात आले होते. मात्र अनेक नातेवाईकक व इतर लोक उपस्थित होऊ शकत नसल्याचे उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात सहा मुलं, चार मुली, सुना, नातवंड, असा मोठा परिवार आहे.

शहर व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख होती. एक जुने व्यापारी आणि विश्वसनीय व्यक्तिमत्व असल्यामुळे अनेक जण त्यांच्या जवळचे होते. त्यांच्या निधनाने व्यापार क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गेल्याने व्यापारी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांति प्रदान करो अश्या शब्दात हिमायतनगर शहर व ग्रामिण भागातील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
