SRTMU Volleyball ; यजमान ‘स्वारातीम’ नांदेड विद्यापीठाची आगेकूच; पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा – NNL
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान नांदेड विद्यापीठाच्या संघाने आनंद कृषी विद्यापीठ, आनंद चा ३-० ने धुवा उडवत आगेकूच केली आहे.
दि. १४ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत ११८ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला आहे. इनडोअर व आउटडोअर मैदानावर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरातच्या सकलचंद पटेल विद्यापीठाने जयपूरच्या विवेकानंद विद्यापीठाचा ३-० ने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अहमदाबादच्या सिल्वरओक विद्यापीठाने कोटा विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. वडोदरा परोल विद्यापीठाने बुंदेलखंड विद्यापीठाचा ३-० असा पराभव केला. वडोदरा विद्यापीठाने जयपूर विद्यापीठाचा, राजकोटच्या मारवाडी विद्यापीठाने पिंदवाडा विद्यापीठाचा ३-० ने ...
