नवीन नांदेड l दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदिर सिडको येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात दंत मुर्ती स्थापना करण्यात आली यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, जयंती निमित्ताने कै.राजाराम ठाकूर यांच्या कृपा आशिर्वादाने ठाकूर परिवार यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.
श्री.दत जयंती निमित्ताने 14 डिसेंबर रोजी गुरूवार बाजार परिसरातील दत्तमंदिर येथे होमहवन यांच्या सह नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात दत्तात्रय मुर्ती स्थापना करण्यात आली, यावेळी श्री दत्तात्रय भारती मठ मोहनपुर ,भगवान भारती महाराज ,
सचिननाथ महाराज,सुनील भारती महाराज,यांच्यी प्रामुख्याने उपस्थिती होती.
सकाळी गुरु नरेंद्र कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली सौ.ललीता मुकुंद बोकारे हे यजमान म्हणून होम हवन महाआरतीची पुजा केली.यावेळी श्री गुरूदेव महिला मंडळ यांनी उपस्थित महिलांनी महाआरती सह दतप्रभु पाळणा ,भजन किर्तन आयोजन करण्यात आले होते.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर,माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, डॉ.नरेश रायेवार, डॉ . गजेंद्र देशपांडे,डॉ.अशोक कलंत्री, डॉ.सुरेखा कलंत्री, मुकुंदराव बोकारे,प्रसन्ना उतरवार ,यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,पत्रकार सारंग नेरलकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून कै.राजाराम ठाकूर यांच्या कृपा आशिर्वादाने ठाकूर परिवार यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री गुरू देवदत महिला मंडळ यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सोहळा यशस्वीतेसाठी गणेश चौडेकर व गुरूदेव महिला मंडळ, भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.