Baburao Kadam Kohlikar ; हदगाव–हिमायतनगर पत्रकार भवनासाठी ४० लाखांचा निधी देणार – आ. बाबुराव कदम कोहळीकर

हदगांव/हिमायतनगर l हदगाव– हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांमध्ये जागा निश्चित केल्यानंतर पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी हदगाव व हिमायतनगर तालुक्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये, असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिले.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार कोहळीकर यांच्या वतीने हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः आमदार बाबुराव कदम कोहळीकर होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बालासाहेब कदम, शिवसेना गटनेते गोपाल सारडा, युवा जिल्हाप्रमुख संदेश पाटील, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख डॉ. संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लाडंगे, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, विजय वळसे पाटील, बबनराव कदम कोहळीकर, विनय देशमुख, शाम पाटील आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आपल्या विविध समस्या मांडत पत्रकार भवनाची तातडीची गरज अधोरेखित केली. पत्रकारांच्या व्यथा, अडचणी व अपेक्षा यावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कारप्रसंगी बोलताना आ. कोहळीकर म्हणाले,“पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजासमोर सत्य मांडले पाहिजे. लेखणीच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय मिळाला पाहिजे. समाजासाठी, लोकशाहीसाठी पत्रकारांची लेखणी झिजली पाहिजे. राजकारणातील खोट्या-नाट्या गोष्टीही पत्रकारांनी निर्भीडपणे उघड केल्या पाहिजेत. तुमच्या लिखाणातून लोकप्रतिनिधींना वास्तव कळते.”

ते पुढे म्हणाले की, “पत्रकार भवनासाठी जागा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जागा निश्चित झाल्यानंतर हदगाव व हिमायतनगर दोन्ही तालुक्यांत पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, तसेच येत्या काळात दोन्ही तालुक्यांत सुसज्ज पत्रकार भवन उभे राहावे यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू.” या कार्यक्रमास हदगाव– हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button