Baburao Kadam Kohlikar ; हदगाव–हिमायतनगर पत्रकार भवनासाठी ४० लाखांचा निधी देणार – आ. बाबुराव कदम कोहळीकर
हदगांव/हिमायतनगर l हदगाव– हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांमध्ये जागा निश्चित केल्यानंतर पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी हदगाव व हिमायतनगर तालुक्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये, असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार कोहळीकर यांच्या वतीने हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः आमदार बाबुराव कदम कोहळीकर होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बालासाहेब कदम, शिवसेना गटनेते गोपाल सारडा, युवा जिल्हाप्रमुख संदेश पाटील, शिवसेना माजी उपजिल्ह...
