Vasavi and Vanita Club CIDCO ; वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा उत्साहात संपन्न

नवीन नांदेड l वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा भक्ती भाव गिताचा कार्यक्रमाला भाविक भक्तांनी ऊत्सफुर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला या वेळी नावाजलेल्या मराठी भावगीते सादर करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही पंधराव्या वर्षी हडको येथील गोविंद गार्डन येथे 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा आयोजित करण्यात आला आहे.

प्रारंभी माता कन्यका परमेश्वरी माता पुजन प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,डॉ.नरेश रायेवार,हभप पिंटू महाराज, पत्रकार रमेश ठाकूर,दिगांबर शिंदे, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुर निरगांस हो गणपती,कानडा राजा पंढरीचा,विठु माऊली यासह भावगिते, भक्ती गायक व वादक कलाकार गोविंद कंधारे, नालंदा सांगविकर,मिरा रियाएईलवार,आकांक्षा मोतेवार, निळकंठ कंधारे,ऊतम कांबळे,विशाल शिरसे,विजय शिरसे,शिलाताई रेवणवार,सुरजित पुजारी,साईनाथ लिगांडे,सुनिल गुरू यांच्या सह सहभागी कलाकार यांनी गिते सादरीकरण केले.

कार्यक्रम सुत्रसंचलन विघाताई पेटकर व संजय काचावार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप येरावार (अध्यक्ष) बालाजी कवटिकवार (सचिव) श्रीनिवास येरावार (कोषाध्यक्ष) अमोल ढमढेरे लक्ष्मण रेवणवार, प्रसन्ना उतरवार, अनिल‌ कोतावार, गजानन बंडेवार, बंडु कवटीकवार, यांच्या सर्व वासवी व वासवी वनिता क्लबचे आजी माजी पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button