नांदेड| दिनांक 18 जुलै, 2024 ला नांदेड येथे के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग), दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड या होत्या. श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक/ नांदेड, डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री एन. एस. राव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक, कार्यालय अधिक्षक, आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती नीति सरकार यांनी सांगितले की डिजिटल पेमेंट मध्ये नांदेड विभागाने चांगली प्रगती केली आहे. बरेच प्रवाशी जनरल तिकीट काढण्याकरीता तिकीट खिडकीवर रांगेत थांबण्या ऐवजी ए.टी.व्ही.एम. आणि यू.टी.एस.एप. चा वापर करून तिकीट काढत आहेत. यातही ए.टी.व्ही.एम. वरुण तिकीट काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यू.टी.एस्. एप वरुन तिकीट काढण्याकरीता प्रवाश्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्या करिता प्रवाशांना रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही, त्यांना तिकीट लगेच उपलब्ध झाले पाहिजे, हे आपले उदिष्ट असले पाहिजे. ए.टी.व्ही.एम. आणि यू.टी.एस.एप. चा वापर करून तिकीट उपलब्ध करून देता आल्यामुळे विना टिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या.


के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांनी प्रवाशांमध्ये ‘UTS-(Unreserved Ticketing System)’ मोबाईल अॅपचा वापर वाढवणे आणि प्रमुख स्थानकांवर उपलब्ध ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स (ATVMs) चा वापर वाढवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर तपशीलवार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. श्री के. सांबशिव राव, यांनी PoS मशीनद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड आणि UPI चा वापर करून तिकीट काढतांना डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.

यूटीएस एप चा अवलंब करून डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार वाढवल्याने प्रवाशांचा वेळ वाचतो, ही अत्यंत सोपे आणि उपयोगी आहे. टिकिट खिडकीवर रोख व्यवहार करण्याची गरज नाही, टिकिट खिडकीवरील गर्दीत थांबायची, धावपळ करण्याची गरज नसते, याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार आणि स्टेशनरी छपाईवरील ताण कमी होतो, असेही ते म्हणाले. श्री सांबशिव राव यांनी विभागीय कर्मचार्यांबना आवाहन केले की त्यांनी वर्षअखेरीस तिकिट विक्रीत UTS अॅपचा हिस्सा वाढवावा आणि UPI द्वारे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे.
डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी आपल्या भाषणात डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आणि तिकीट काढण्याच्या सुलभ पद्धती जसे की “UTS” अॅप आणि स्थानकांवर जनजागृती मोहीम हाती घेऊन ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्सचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली. प्रखर जागरुकता मोहिमेद्वारे प्रवाशांमध्ये UTS अॅप लोकप्रिय करून संपूर्ण विभागातून खरेदी केलेल्या एकूण तिकिटांमध्ये UTS तिकिटांची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.
नांदेड विभागातील बुकिंग पर्यवेक्षक, कमर्शियल इन्स्पेक्टर, तिकीट निरीक्षक आणि आरक्षण पर्यवेक्षक यांच्या संवर्गातील मोठ्या संख्येने रेल्वे व्यावसायिक विभागाचे कर्मचारी नांदेड येथील या चर्चासत्रात सहभागी झाले आणि त्यांनी प्रवासी व्यवसायात आणखी सुधारणा करण्यावर आपली मते/सूचना मांडल्या.
“UTS’ मोबाईल अॅप वापरण्याचे फायदे :
“UTS’ मोबाईल एप अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग, UTS एप वापरा, रेल्वे तिकीट खिडकी वर रांग टाळा , R-wallet रिचार्ज वर 3 % बोनस मिळवा. तुम्ही रेल्वे स्थानकां पासून अगदी तुमच्या घरातूनही अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करू शकता, रांगेत न थांबता काही सेकंदातच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अनारक्षित तिकीट खरेदी करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करूनही तिकीट खरेदी करता येते.
मोबाईल वरून तिकीट खरेदी करण्याच्या सोप्या पायऱ्या मुफ्त नोंदणी करा, लॉग इन करा, तिकीट खरेदी करा, (साधारण/सीजन/फलाटफॉर्म), आर-वालेट वापरून किंवा डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरून किंवा इंटरनेट बँकिंग वरून किंवा युपिआइ वरून पेमेंट करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, सीजन तिकीट 10 दिवसा पूर्वी खरेदी करू शकता, तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते, मदत क्र. 139 / Rail Madat वर अधिक माहिती घेता येते.

