उस्माननगर, माणिक भिसे l जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दि ७ जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी अचानक उस्मान नगर येथील ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.केंद्रीय शाळा , अंगणवाडी यांना भेटी देऊन शासकीय स्तरावरील योजनेची कसून तपासणी केल्याने ग्रामसेविका सौ डि.ए शिंदे यांची चांगलीच तारांबळ उडाली यावेळी सिईओ मिनल करनवाल यांनी त्यांना खडेबोल ऐकविल्याचे सांगण्यात येत आहे. एकदरित ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना व्यवस्थित राबविल्या जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सीईओ यांचा कंधार दोरा असल्याने त्यांनी जाताना त्यांनी उस्माननगर येथील ग्रामपंचायत , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ,व अंगणवाडी , यांना अचानक भेट दिल्यानंतर अनेक कामाची चौकशी केली. यामधे ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या घरकुल योजना विषयी माहिती प्राधान्याने माहिती घेत २०२२ पासून ते आजपर्यंतची विचारली असता संबंधित ग्रामपंचायत अधिकारी सौ.शिंदे यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे त्यांची गत आडकित्यात आडकिल्यासुपारी सारखी झाल्याचे दिसून आले .
यावेळी बिडीओ पाटील यांना सुध्दा समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत त्यांना देखील सीईओना उत्तर देताना तारेवरची कसरत करावी लागली. अंगणवाडी मधील ० ते ५ वर्षापर्येत च्या बाळाला शालेय पोषण आहार पंचायत मार्फत पुरविला जातो. पण तो निधी आतापर्यंत मिळाला नसल्याची बाब संबंधित अंगणवाडी शिक्षकेने मिनल करनवाल निदर्शनास आणून दिले यावर देखी नाराजी व्यक्त करण्यात आली आज पर्येतचा खाऊ कोणाच्या घशात गेला याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
२०२२ते २०२३ पासून ग्रामपंचायतने १४व १५ वित्त आयोगाचा निधी खर्च केला नसल्याने सिईओ चंगल्याच संतापल्या. त्याच बरोबर अपूर्ण घरकुल नवीन लाभार्थी यादी संदर्भात सुध्दा नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे ग्रा पं. ढिसाळ कारभाराचे सिईओ यांना दर्शन झाल्याचे लोकांतून बोलल्या जात आहे उस्माननगर गावातील अनेक नाल्या अनेक दिवसापासून तुंबल्या असून या स्वच्छतेकडे सीईओ यांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे..