Osmannagar ; उस्माननगर ग्रा. पं. ला सिईओ मिनल करनवाल यांची अचानक भेट – NNL
उस्माननगर, माणिक भिसे l जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दि ७ जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी अचानक उस्मान नगर येथील ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.केंद्रीय शाळा , अंगणवाडी यांना भेटी देऊन शासकीय स्तरावरील योजनेची कसून तपासणी केल्याने ग्रामसेविका सौ डि.ए शिंदे यांची चांगलीच तारांबळ उडाली यावेळी सिईओ मिनल करनवाल यांनी त्यांना खडेबोल ऐकविल्याचे सांगण्यात येत आहे. एकदरित ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना व्यवस्थित राबविल्या जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सीईओ यांचा कंधार दोरा असल्याने त्यांनी जाताना त्यांनी उस्माननगर येथील ग्रामपंचायत , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ,व अंगणवाडी , यांना अचानक भेट दिल्यानंतर अनेक कामाची चौकशी केली. यामधे ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या घरकुल योजना विषयी माह...
