नांदेड l नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दैनिक सत्यप्रभा कार्यालयात आज सोमवारी ( दि.६ जानेवारी ) दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दैनिक सत्यप्रभा कार्यालयात सोमवारी सकाळी ११.३० आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एन.एम. बेंद्रीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, अभिजीत देशमुख, पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक ॲड. प्रदीप नागापूरकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमूख ॲड.दिगंबर गायकवाड,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रविंद्र संगनवार, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे आदिंची उपस्थिती होती.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
या कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छतीसगड येथील पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर, उमरी येथील पत्रकार स्व.गंगाधर सवई, साहित्यिक तथा पत्रकार स्व. आनंद गायकवाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
त्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, विजय जोशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर ज्येष्ठ पत्रकार एन.एम. बेंद्रीकर यांनी शेवटी अध्यक्षीय समारोप केला. जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस राम तरटे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार ॲड.प्रदीप नागापुरकर यांनी आभार मानले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
याप्रसंगी अनिकेत कुलकर्णी, कालिदास जहागीरदार, बजरंग शुक्ला, महेश राजे,लक्ष्मण भवरे,सादिक शेख,राजेश शिंदे,राजू गिरी,,कमलाकर बिरादार,रवींद्र कुलकर्णी, अनुराग पवळे, अमृत देशमुख, किरण कुलकर्णी, रमेश पांडे, सुरेश काशिदे, संगमेश्वर बाचे, प्रल्हाद लोहेकर, प्रशांत गवळे, गजानन कानडे, अविनाश चमकुरे, संजय सूर्यवंशी,कुंवरचंद मंडले, संघरत्न पवार, नरेश तुप्तेवार ,संभाजी सोनकांबळे, जयवर्धन भोसीकर, शरद काटकर, राहुल गजेंद्रगडकर, राजेंद्र कांबळे, गणेश कांबळे, संदीप गायकवाड ,शेख मुजीब, भास्कर जांबकर, सुधीर प्रधान, महेंद्र आठवले, संतोष जोशी, दिगंबर शिंदे, राजकुमार कोटलवार, आनंद कुलकर्णी, अभिषेक एकबोटे, सय्यद गौस, सचिन डोंगळीकर, गिरीश वाकोडीकर.
गंगाधर गच्चे, राहुल साळवे, चंद्रकांत गव्हाणे, माधव गोधणे, श्रीराम मोटरगे, नुकुल जैन, स्वप्नील बेंद्रीकर, चंद्रकांत घाटोळ, गणेश वडगावकर, बाबू जल्देवार, गणपत बनसोडे ,भागवत गायकवाड, हरजदिर संधु, प्रमोद गजभारे यांच्यासह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दामोदर नागोरे, शेख मोईन, भोळे आदींनी परिश्रम घेतले.