उस्माननगर l मराठी पत्रकारितेचे जनक आद्य आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनानिमित्त उस्माननगरसह परिसरातील विविध ठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा सन्मान करण्यात आला.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रितिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे प्रदीप देशमुख , माणिक भिसे , लक्ष्मण कांबळे , सुर्यकांत मालीपाटील , देविदास डांगे , राजीव अंबेकर सर , अमजद खान पठाण , विठ्ठल ताटे पाटील , बाजीराव पाटील गायकवाड , लक्ष्मण भिसे , देवानंद भिसे , यांची यावेळी उपस्थिती होती.
त्यानंतर सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मानल्या गेलेल्या पत्रकार बांधवांना सन्मानित करून शुभेच्छारुपी प्रोत्साहन देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी पेन व कॅलेंडर भेट दिली. व यावेळी सर्व पत्रकार सह शाळेचे सहशिक्षक भगवान राक्षसमारे, मन्मथ केसे , सिध्दोधन लाटकर , शखील शेख , यांच्या सह सहशिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक खान , सहशिक्षक एकनाथ केद्रे , सोनकांबळे , पत्रकार बांधवांचा वही ,पेन , शाल पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा दिल्या.
शिराढोण येथे सत्कार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उस्माननगर व शिराढोण येथील पत्रकार बांधवांचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिराढोण येथे शुभेच्छारूपी पेन वही शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच खुशालराव पांडागळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव मालीपाटील , प्रभाकर कपाळे ( अध्यक्ष शा. व्य.समिती ) , प्रविण पाटील ( केंद्रप्रमुख) , सौ. तारा मठपती ( मुख्याध्यापिका ) व पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रितिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे वतीने पत्रकार बांधवांचा वही पेन शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर , साईनाथ केते , शुभम डांगे , देविदास डांगे , व्यंकटराव मालीपाटील , केंद्रप्रमुख प्रविण पाटील, खुशालराव पांडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन राठोड यांनी मानले.शिराढोण ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने सरपंच खुशालराव पांडागळे यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचा आदरपूर्वक सत्कार करून दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उस्माननगर पोलिस स्टेशन येथे पोलिस स्थापना दिन व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार बांधवांशी संवाद साधला आणि दर्पणदिना निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि शांतता राखावी.यासह अन्य गोष्टी वर संवाद साधला.यावेळी उस्माननगर व शिराढोण येथील पत्रकार बांधव उपस्थित होते.