Osmannagar ; उस्माननगर परिसरात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान – NNL
उस्माननगर l मराठी पत्रकारितेचे जनक आद्य आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनानिमित्त उस्माननगरसह परिसरातील विविध ठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा सन्मान करण्यात आला.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रितिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे प्रदीप देशमुख , माणिक भिसे , लक्ष्मण कांबळे , सुर्यकांत मालीपाटील , देविदास डांगे , राजीव अंबेकर सर , अमजद खान पठाण , विठ्ठल ताटे पाटील , बाजीराव पाटील गायकवाड , लक्ष्मण भिसे , देवानंद भिसे , यांची यावेळी उपस्थिती होती.
त्यानंतर सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित...
