Collecter Abhijit Raut ; दर्पण दिनानिमित्त सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान; नियोजन भवनमध्ये 4 वाजता पत्रकार दिन कार्यक्रम -NNL

नांदेड। 6 जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ‘ या विषयावर पत्रकारांना संबोधित करणार आहेत.

नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड पोलीस प्रशासन, जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी,दर्पण दिनाच्या पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

6 जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसोबत प्रशासनाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी ‘, या विषयावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बातमीदारीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याचे फायदे व तोटे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपस्थित राहणार असून ते देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्ह्यातील विविध संघटनांशी, माध्यम संस्थांशी, केंद्रांशी संबंधित सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button