HomeनांदेडMLA Dr. Tushar Rathod : रुग्णसेवेची परीपुर्ण ज्ञान असणाऱ्यारे आमदार डॉ तुषार...

MLA Dr. Tushar Rathod : रुग्णसेवेची परीपुर्ण ज्ञान असणाऱ्यारे आमदार डॉ तुषार राठोड यांची आरोग्यमंत्री पदी निवड कारा – आदी बनसोडे -NNL

नांदेड| मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपा पक्षाकडून प्रचंड मताधिक्याने विजयी होणारे आमदार डॉ तुषार राठोड साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळा मध्ये आरोग्यमंत्री पदी निवड करुन, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा मजबुती करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी नर्सेस संघटना समन्वय आदी बनसोडे यांनी केली आहे…!

मुखेड कंधार मतदार संघामध्ये मागील दहा वर्षांच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात निधी मंजूर करुन तालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे, डॉ तुषार राठोड हे स्वतः एम बि बि एस , रेडीओलाॅस्टिट वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वडीलांच्या निधनामुळे, रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारसंघातील नागरीकांच्या आग्रहास्तव राजकारण आले..!

त्यांनी मतदार संघात सर्वाणगिक विकासाबरोबरच शहरातील नागरिकांनसह ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची मंजुरी आणून, तालुक्यातील आरोग्यसेवा मजबुत केली आहे, शहरांमध्ये 100 खांटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले, कोरोना काळात देवदुता सारखं नागरिकांच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे आरोग्याची काळजी घेतली, नागरिकांना मास्क वाटप, आरोग्य तपासणी, सोशल डिसटंन्स पाळून भाजीपाला, किराणा उपलब्ध करुन दिले, अनेकांना राशन किट वाटप केले. नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः कोव्हिड पाॅझिटीव्ह झाले, असे होऊनही कोव्हिड रुग्णांना वेळोवेळी धिर दिला.

अंगणवाडी, शाळा बंद असताना शासनाकडून मागणी करुन, पाकीट बंद खाऊचे घरपोच वाटप करुन, बालकांच्या पोषणाची जबाबदारी देऊन कुपोषणापासुन रोखणाऱ्या, अशा कार्यसम्राट, आरोग्यसम्राट, युवा नेतृत्व लोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांची महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात आरोग्यमंत्री पद देऊन महाराष्ट्राची आरोग्यसेवा मजबुत करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मतदार संघातील युवक आरोग्यदूत नर्सेस संघटना मराठवाडा विभागाचे समन्वयक आदी बनसोडे यांनी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments