‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघाच्या हदगाव तालुक्यातील १७ व हिमायतनगर येथील २ देवस्थानांना अखेर जिल्हा वार्षिक योजना २०२५ अंतर्गत ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


हदगाव विधानसभा मतदारसं घाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दि. ३० जानेवारी २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मांडला होता. त्यांनी या निर्णयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. आमदार कोहळीकर यांनी २० जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील १९ स्थळाला अधिकृतपणे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा अखेर मिळवून दिला.

‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त श्रद्धास्थानानमध्ये हदगाव तालुक्यातील उखळाई देवी देवस्थान (हदगाव), महादेव मठ देवस्थान (हदगाव), लकोडोबा देवस्थान (तालंग), कोंडलीगेश्वर देवस्थान (शिवपुरी), बिरोबा देवस्थान (पळसा), पिंगळा देवी देवस्थान (पिंगळी), हनुमान मंदिर देवस्थान (कोहळी), ईसाई माता देवस्थान (वाळकी बा.), महादेव मंदिर देवस्थान (उमरी खु.) महादेव मंदिर देवस्थान (महाताळा), दत्त मंदिर देवस्थान (कोळी), हनुमान मंदिरी देवस्थान (चक्री) सटवाईमाता देवस्थान (मनुला), माळाचा मारोती मंदिर देवस्थान (कोहळी), दत्त मंदिर देवस्थान (पेवा) नेताजी पालकर समाधी स्थळ (तामसा), हौसाजी नोवसाजी नाईक समाधी स्थळ (नाव्हा)


तर हिमायतनगर तालुक्यातील महादेव मंदिर देवस्थान (विरसनी), लकडोबा देवस्थान (खडकी) आदी स्थळांचा समावेश आहे. तीर्थस्थळात समावेश झाल्याने आगामी काळामध्ये वरील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, देवस्थान व परिसराचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील असे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी म्हटले आहे.




