Sunday, June 28

Tag: get ‘C’ class pilgrimage status

‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघाच्या हदगाव तालुक्यातील १७ व हिमायतनगर येथील २ देवस्थानांना अखेर जिल्हा वार्षिक योजना २०२५ अंतर्गत 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हदगाव विधानसभा मतदारसं घाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दि. ३० जानेवारी २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मांडला होता. त्यांनी या निर्णयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. आमदार कोहळीकर यांनी २० जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील १९ स्थळाला अधिकृतपणे 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा अखेर मिळवून दिला. 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त श्रद्धास्थानानमध्ये हदगाव तालुक्यातील उखळाई देवी देवस्थान (हदगाव), महादेव मठ देवस्थान (हदगाव)...
error: Content is protected !!