उमरखेडक्राईमहिंगोली

उमरखेड शहरातील गुन्हेगारावर आता पोलिसांची करडी नजर NNL

शहरात १६५ हायस्पीड कॅमेरे !

उमरखेड, अरविंद ओझलवार। यवतमाळ जिल्ह्यात अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या उमरखेड शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात जवळपास १६५ हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावणे सुरू आहे . त्यामुळे शहराच्या हालचालीवर पोलीस यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याने निश्चितच गुन्हेगारीच्या घटनेवर अंकुश मिळविता येणार आहे .

महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे उमरखेड शहरातील पोलीस ठाण्यातून सीसीटीव्ही लावण्या संदर्भाचा अहवाल गेल्याने औरंगाबाद येथील एका कंपनीकडून शहरातील तब्बल ४५ लोकेशनवर जवळपास १६५ डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे .

शहरात लावण्यात येणाऱ्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अत्याधुनिक अशी ऑडिओ सिस्टीम व काही जागांवर फिरते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने परिसरातील प्रत्येक बारीक हालचालीवर उमरखेड पोलीस ठाण्यातून नजर ठेवल्या जाणार आहे .या सर्व हाय स्पीड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उमरखेड पोलीस ठाण्यात कंट्रोल रूम राहणार असून कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब तिथे पोलीस यंत्रणा पोहोचणार असल्याने गुन्हेगाराला ताबडतोब शोधून काढता येणार आहे . शहरातील वाहतूक कोंडी असेल कुठे अपघात झाला असेल कुठे चैन स्केचिंगचा प्रकार घडला असेल तर लगेच पोलिस यंत्रणेला याची माहिती मिळणार आहे .

शहरातील ४५ लोकेशन मध्ये गावंडे कॉलेज, चुरमुरा टी पॉइंट, ढाणकी रोड उड्डाणपूल ,महागाव रोड बायपास ,.यूपीपी कॉलनी, बिरसा मुंडा चौक पुसद रोड ,महादेव मंदिर, भगतसिंग वार्ड, नांदेड रोड बायपास, रहीम नगर नांदेड रोड ,फार्मसी कॉलेज तिवडी रोड, लेंढी पुल उड्डाणपूल ,जामा मजीद ,आठवडी बाजार, मक्का मजीद ,बसवेश्वर मंदीर, कराळे किराणा दुकान, ताजपुरा वाचनालय, मौला अली चौक, नाग चौक ,बस स्टॅन्ड आत आणि बाहेर, गायत्री चौक, शिवाजी चौक ,.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,गांधी चौक ,ऐश्वर्या मेडिकल , खडकपुरा ,हुतात्मा चौक , अबरार चौक ,हुसेन चौक, राम मंदिर ,रजा चौक, तहसील कार्यालय गोडाऊन ,नागापूर रूपाला, पोस्ट ऑफिस समोर, हनुमान मंदिर ,कृष्ण मंदिर, धोंगड्या पीर बाबा, मूर्तिकार गल्ली, कवडाच्या बाबा ,कृषी उत्पन्न बाजार समिती ढाणकी रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद रोड या लोकेशनचा समावेश असून त्या प्रत्येक लोकेशनवर एका एका जागेवर चार ते पाच कॅमेरे लावण्यात येत आहेत .त्यामुळे आता शहरात कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास ती घटना उमरखेड पोलीस ठाण्यात त्वरित दिसणार असून आता यापुढे गुन्हेगार कोण हे सहज ओळखता येणार असल्याने निश्चितच गुन्हेगारीवर पोलिसांची वचक राहणार आहे .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button