उमरखेड शहरातील गुन्हेगारावर आता पोलिसांची करडी नजर NNL
उमरखेड, अरविंद ओझलवार। यवतमाळ जिल्ह्यात अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या उमरखेड शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात जवळपास १६५ हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावणे सुरू आहे . त्यामुळे शहराच्या हालचालीवर पोलीस यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याने निश्चितच गुन्हेगारीच्या घटनेवर अंकुश मिळविता येणार आहे .
महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे उमरखेड शहरातील पोलीस ठाण्यातून सीसीटीव्ही लावण्या संदर्भाचा अहवाल गेल्याने औरंगाबाद येथील एका कंपनीकडून शहरातील तब्बल ४५ लोकेशनवर जवळपास १६५ डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे .
शहरात लावण्यात येणाऱ्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अत्याधुनिक अशी ऑडिओ सिस्टीम व काही जागांवर फिरते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने परिसरातील प्रत्येक बारीक हालचालीवर उमरखेड ...
