Two Wheeler Thift ; हिमायतनगर शहरातील संभाजीनगर भागातून दुचाकी चोरीला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिस तपास सुरू

हिमायतनगर। शहर व परिसरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढतंच आहेत, दुचाकी चोरीच्या घटनांना आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिनांक 18 रोजी हिमायतनगर शहरांतून चोरीला गेलेल्या दुचाकीच्या घटनेवरून दिसून येत आहे

नुकतेच हिमायतनगर शहरातील छत्रपती संभाजी नगर भागातील एका घरासमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे, याबाबत हिमायतनगर पोलिसात श्री वाळके यांनी तक्रार दिली, वृत्त प्रकाशित करेपर्यंत गाडीचा कुठंही शोध लागला नाही, त्यामुळे घरमालक यांनी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन स्वतःच्या गाडीप्रमाणे दुचाकी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन येत आहे.

आणखी पावसाळा सुरू होणे बाकी आहे, त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अश्या चोरीच्या घटना शहर व तालुक्यात घडणार नाही याची काळजी घेऊन आत्तापर्यंत चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लावून चोरट्यांच्या मुसक्या अवळाव्यात अशी मागणी साहेबराव वाळके यांनी एका निवेदनाद्वारे केली जाते आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button