नांदेडराजकीय

Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

नांदेड| गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या माळेगांव मक्ता ता.देगलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने विशेष बाबा म्हणून माळेगांव मक्ता येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याचे माहिती माळेगांवचे सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी दिली.

तेलंगना व कर्नाटक प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता या गावची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. माळेगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्नशील होते. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून माळेगांवला नविन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी देण्याची विनंती चिखलीकर यांनी केली होती. माजी खा.चिखलीकर यांच्या विनंतीला मान देवून आरोग्य मंत्रालयाने दि.26 स्पटेंबर 2024 रोजी शासन निर्णय जारी करुन माळेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आला असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जिल्हा नियोजन निधीतून झाल्यानंतर पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासन निर्णय आरोग्य विभागाचे उपसचिव शि.म.धुळे यांनी राज्यपालाच्या आदेशानुसार मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची इमारत मोडकळीस आल्यामुळे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी तत्कालीन सरपंच बळीराम म्हैसाजी सोनकांबळे व उपसरपंच ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांच्या कार्यकाळात ठराव मंजूर करुन आरोग्य केंद्रास लागणारी दीड एकर जमीन देण्याच्या ठरावास एकमताने मंजूरी देण्यात आली होती.

जिल्हा परिषदेचे सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगांवकर व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या सहकार्याने जि.प.सर्वसाधारण सभेत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करुन कृतीविकास आराखड्यात माळेगांवचा समावेश करुन परिपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दोन वर्षापूर्वी पाठविण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबीत असलेल्या माळेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची शिफारस तत्कालीन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लेखीस्वरुपात आरोग्य मंत्र्याकडे करुन प्रत्यक्षात त्यांची भेट घेवून आरोग्य केंद्र मंजूर करण्याची विनंती केली होती.

गेल्या एक-दीड वर्षापासून माळेगांवचे सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी अनेक वेळा मुंबईच्या चकरा मारुन केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी सतत पाठपुराव केल्याबद्दल सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांचे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन होत आहे. माळेगांवला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विशेष प्रयत्न  केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी जाहिर आभार मानले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button