Wednesday, May 13

Tag: at Malegaon Makta

Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या माळेगांव मक्ता ता.देगलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने विशेष बाबा म्हणून माळेगांव मक्ता येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याचे माहिती माळेगांवचे सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी दिली. तेलंगना व कर्नाटक प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता या गावची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. माळेगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्नशील होते. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून माळेगांवला नविन प्राथमिक आरोग्य केंद्र...
error: Content is protected !!