नांदेड| अबिनाश कुमार (I.P.S.) पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने जबरदस्त कामगीरी केली असून, आरोपी अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेला माल २,२४,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ०५/१२/२०२४ रोजी कोबींग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्यीतील वसंतनगर पाटीजवळुन मोटार सायकलवरील इसमांचे पैशाची बॅग चोरी करणारे आरोपी देगलुरनाका, नांदेड परीसरात आहेत. अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकांने मच्छीमार्केट, देगलुरनाका, नांदेड येथील बुध्दविहाराचे बाजुचे मोकळ्या जागेतुन सापळा रचुन योग्य त्या बळाचा वापर करुन आरोपी अटक केली आहे.
यामध्ये नामे १) प्रशिक ऊर्फ परस्या दिलीप ओढणे वय २५ वर्ष व्यवसाय बेकार रा. संघसेननगर, इतवारा नांदेड २) चंद्रशेखर ऊर्फ चंदया पि. देवराव पाईकराव वय २६ वर्ष व्यवसाय बेकार रा. संघसेननगर, इतवारा नांदेड ३) सक्षम गौतम ताटे वय १९ वर्ष व्यवसाय बेकार रा. संघसेन नगर, इतवारा नांदेड यांना ताब्यात घेवुन माली गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी व त्यांचे दोन साथीदार नामे १) रोशल हाळदे रा. हनुमानगड कमानजवळ नमस्कारचौक, नांदेड २) सोहेल उर्फ चिंदी फिरोज खान पठाण रा. नवीआबादी शिवाजीनगर नांदेड यांनी मिळुन १) पोलीस ठाणे शिवाजीनगर गुरनं. ४८३/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. २) पोलीस ठाणे भोकर गुरनं. ३८३/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. व ३) पोलीस ठाणे उमरी गुरनं. ३१२/२०२४ कलम ३०९(४), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हे केले असल्याचे सांगीतले आहे.
मिळुन आलेल्या तिन आरोपीतांकडुन गुन्हयातील गेले मालापैकी नगदी १,३४,०००/- रुपये, गुन्हयात वापरेली मोटार सायकल किमती ९०,०००/-रुपये असा एकुण २,२४,०००/- रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला असुन नमुद तिन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे देण्यात आले आहे. नमुद आरोपीतांकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कामगीरी बाबत स्थागुशाचे वरील नमुद अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
अबिनाश कुमार, (I.P.S.), पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, मिलींद सोनकांबळे पोलीस उप निरीक्षक, स्थागुशा नांदेड, माधव केंद्रे, ग्रेड पोलीस उप निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, अफजल पठाण, गणेश लोसरवार, बालाजी यादगीरवाड, चंद्रकांत स्वामी, राहुल लाठकर, सिध्दार्थ सोनसळे, दिपक ओढणे, राजु सिटीकर, रेश्मा पठाण यांनी केली आहे.