नांदेड| शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी, बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा-या चाहन चालकावर व शहरातील अनाधिकृत अतिक्रमण विरुध्द कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार साहेब यांनी आदेश दिले होते.
दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 04/12/2024 व 05/12/2024 रोजी वजिराबाद चौक ते आय.टी. आय पर्यंत विशेष मोहीम घेवुन अतिक्रमन काढण्यात आले. सदर मोहीमे मध्ये शहर वाहतुक शाखा येथील सहा. पोलीस निरीक्षक श्री. बळवंत जमादार, पोउपनि श्री कोटतीर्थवाले, पोउपनि श्री केळकर व ट्राफीक अंमलदार. दंगानियंत्रण पथक, नांदेड वाघाळा शहर नगर पालीका यांचे अतिक्रमन पथका सोबत संयुक्त कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या 208 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचेकडून 3.31.750/-रु दंड करण्यात आला तसेच 85 अणपेड चलनाचे वाहन चालकाकडुण 69,700/ रु दंड वसुल करण्यात आला.