![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Suresh-Palshikar.jpg)
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, नांदेड जिल्हयातील सक्रिय गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 05.12.2024 रोजी पहाटे 04.00 ते 08.00 वा. पावेतो कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
कॉम्बींग ऑपरेशनसाठी 12 अधिकारी लावण्यात आले होते, तर कॉम्बींग ऑपरेशनसाठी 259 अंमलदार लावण्यात आले होते. या पथकाने कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान प्रो. रेड केसेस 04 एकुण आरोपी – 04 एकुण मुद्देमाल 22,260 जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाविरुध्द गुन्हेगार चेक (दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) पाहिजे असलेल्या एका फरारी आरोपीला अटक करण्यात आली असून, एम.व्हि. अॅक्ट प्रमाणे कार्यवाही 10 केसेस करण्यात आले असून, एकूण 7 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 8 जणांना बेलेबल वॉरंट तामील करण्यात आले असून, 40 नॉन बेलेबल वॉरंट तामील करण्यात आले. म.पो.का. कलम 122 प्रमाणे कारवाई निरंक असून, आर्म अॅक्ट प्रमाणे दोघांवर कारवाई तर गोवंश प्रतिबंधक कायदा प्रमाणे कारवाई निरंक आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोस्टे शिवाजीनगर गुरन 483/2024 कलम 309(4).3 (5) बीएनएस हा गुन्हा उघडकीस आणुण 03 आरोपी अटक केले. त्या तीन आरोपीतांनकुडन आणकी दोन जबरी चोरीचे गुन्हे पोस्टे भोकर गुरन 383/2024, पोस्टे उमरी गुरन 212/2024 कबुल केल्याने त्यांचे ताब्यातील तीन गुन्हयातील मुद्येमाल एकुण 2,24,000/-रू जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 01 पाहीजे असलेला आरोपी अटक, 03 जबरीचे जोरीचे आरोपी अटक करून त्यांच्याकडुन आणखी दोन गुन्हे असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
सदर कॉम्बींग ऑपरेशन हे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड जिल्हा, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे व स्थागुशाचे पोलीस अंमलदार यांनी, नांदेड जिल्हयात कॉम्बींग ऑपरेशन राबवून वरील प्रमाणे कारवाई केली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)