हिमायतनगर, अनिल मादसवार| मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नसून, सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करून त्यांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेच्या समस्यांचे निवारण करणे आपले कर्तव्य समजून काम करणार आहे. जनतेच्या समस्या अडीचडचणी समजून घेण्यासाठी आजची आमसभा, जनता दरबार व पाणी टंचाई आढावा अशी संयुक्त बैठक घेतली आहे. मागील काळात काय झालंय त्याचं मला काही देणेघेणे नाही. परंतु यापुढे सर्वसामान्य गोगरिबांच्या कामात अडथळा निर्माण होता कामा नये. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून जनतेच्या समस्यां वेळात सोडवाव्यात. प्रत्येक गावाला पाणी मिळाले पाहिजे याची जबाबदारी ग्रामसेवकांनी पार पाडावी. जनतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोणाची तक्रार आल्यास त्याची कदापि गय केली जाणार नाही अश्या शब्दात आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Mla Baburao Kadam)यांनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना फटकारले.

ते हिमायतनगर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक १३ सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार, पाणी टंचाई आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर हादगावचे उपविभागीय अधिकारी श्री कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, विकास पाटील देवसरकर, गजानन तुपतेवार, संभाराव लांडगे मामा, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, बाळासाहेब देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतल भांगे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पाणी पुरवठा नियोजन कृती आराखडा बैठकीत आणि जनता दरबारात (Janta Darbar) जवळपास सर्वच विभागाच्या तक्रारीचा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला. त्यात एकंबा, टाकराळा, दरेसरसम, जवळगाव, सिबदरा, सरसम, पळसपूर गावातील तक्रारी चर्चेत अग्रस्थानी होत्या. तसेच शिक्षण, बांधकाम, पाणी पुरवठा, सामाजिक वनीकरण, आरोग्य, महावितरण, कृषी विभाग, बालविकास प्रकल्प, तहसील, पंचायत समितीच्या विविध योजनांना बाबत देखील असंख्य नागरीकांनी तक्रारी उपस्थित केल्या. एकूणच या सर्व तक्रारींच्या संख्येवरून आणि आलेल्या निवेदनाच्या गठ्ठयावरून हिमायतनगर तालुक्याचा विकास मागील कालावधीत कश्या प्रकारे झाला याचे वास्तव चित्र समोर आले आहे.

अनेक गावांच्या नागरीकांनी आमदार महोदयांच्या उपस्थितीत संबंधित गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शासकीय योजनांची अंमलबजावणी करत नसल्याच्या आणि महिनो महिने गावात फिरकत नसल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारीच्या अनुषंगाने पुढे बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले कि, पाठीमागच्या काळात जे कोणी अधिकाऱ्यांनी वेळेवर कामे केली नाहीत. त्यांनी आपल्या कामात तात्काळ सुधारणा करावी. त्यांना आठ पंधरा दिवसांचा कालावधी देतो, त्यांनी आपल्या कामात सुधारणा करून कामाची गती वाढवावी. आणि गावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. यापुढे मी स्वतः शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, आणि ज्या गावातील समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबवित आहेत तेथे भेट देऊन पाहणी करणार आहे. तत्पूर्वी आपली रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करून पारदर्शकता दाखवून द्यावी अश्या कडक सूचना आमदार महोदयांनी सर्व खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या.

यावेळी बोलताना आमदार महोदय म्हणाले कि, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात पुढील २० वर्षाचा विचार करून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. पण त्या गावांना अजूनही पाणीच मिळत नसेल आणि दरवर्षी बोअर घ्यावे लागत असतील तर काय फायदा (?) शासनाचा पैसा म्हणजे आपलाच आहे. त्या निधीचा योग्य विनियोग व्हायला पाहिजे. त्यामुळे कमी खर्चात चांगली कामे कशी होतील याकडे गावातील सरपंच, ग्रामसेवकाने लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी कामे रखडली ती कामे तात्काळ मार्गी लावायला पाहिजे. जिथे अत्यवश्यक आहे तिथे तात्काळ नवीन मोटारी घेऊन पाणी उपलब्ध करून देऊन गावकऱ्यांची अडचण सोडावा अश्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हि आमसभा जवळपास रात्री ८ वाजेपर्यंत चाललंय तरी अनेकांचे प्रश्न व समस्यांवर विचारमंथन करण्यास वेळ कमी पडला अशी खाणारी आमदार महोदयांनी बोलून दाखवीत यापुढे सर्व कामच दार तीन महिन्याला सर्कलवाईज आढावा घेतला जाईल. आणि प्रत्यक्ष ती कामे पूर्ण होऊन समस्या निकाली निघालेत कि नाही यांचा आढावा घेतला जाईल. कोणता अधिकारी जर कामात हलगर्जीपणा करून त्रास देत असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा असे आवाहनही आमदार कोहळीकर यांनी उपस्थित जनतेला केले.
