किनवट,परमेश्वर पेशवे। सततच्या नापिकि व कर्जबाजारीला कंटाळून एका पस्तीस वर्षे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक २ नोव्हेंबर रात्री किनवट तालुक्यातील येणाऱ्या इस्लापूर सर्कलजवळील भिशी या गावी घडली आहे.
ऐन दिपवाळीच्या सणाची धामधूम चालू असताना भिशी येथील लक्ष्मण रमेश शिरगिरे वय 35 वर्षे या तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पीक कर्जास व सततच्या नापिकीस कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. सदरील तरुणाचे शवविच्छेदन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदरील तरुणाच्या कुटुंबामध्ये पत्नी दोन मुली व एक नऊ महिन्याचे बाळ महिलेच्या पोटात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पुढे येत असून सदरील घटनेचा तपास स.पो.नि. उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.