Wednesday, May 13

Tehsil office : देगलूरकरांसाठी दिलासा! आ. अंतापूरकरांच्या पुढाकाराने तहसिल कार्यालय शहरातच

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुका तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी योग्य जागेच्या शोधाला अखेर दिशा मिळाली आहे. आ. जितेश अंतापूरकर यांच्या पुढाकारामुळे (Relief for Deglurkars! On the initiative) आता नांदेड-हैदराबाद हायवेलगत असलेल्या तालुका कृषी कार्यालयाच्या रिकाम्या पाच एकर जागेत नवीन तहसील इमारत उभारण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे.

या जागेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून, शहरातील नागरिकांसाठी ही बाब एकप्रकारे दिलासादायक ठरली आहे. याआधी तहसील कार्यालयासाठी पिंपळगाव येथे जागा सुचवण्यात आली होती, मात्र ती जागा तेलंगणा सीमेजवळ असून शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासात अडचणी आल्या असत्या, शिवाय प्रशासकीय दृष्टिकोनातूनही ती जागा अनुकूल नव्हती.

IMG 20250707 WA0074 Tehsil office : देगलूरकरांसाठी दिलासा! आ. अंतापूरकरांच्या पुढाकाराने तहसिल कार्यालय शहरातच

दरम्यान, आ. अंतापूरकरांनी स्थानिक प्रशासनास योग्य जागेची निवड करताना नागरिकांच्या सुविधांचा विचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी कृषी कार्यालयाजवळील शहरातीलच जागा सुचवली होती आणि त्यानुसार तातडीने त्या जागेचा अहवाल सादर करण्यात आला. आ. अंतापूरकरांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे हजारो नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. ही बाब स्थानिक विकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!