करियरनांदेड

Mahaparinirvana Day : हुजपा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन

हिमायतनगर| तालुक्यातील हुजपा महाविद्यालयात 06 डिसेंबर 2025 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संगपाल प्रकाश इंगळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत बाबासाहेब केवळ दलितांचे कैवारी नसून भारत देशाचे कैवारी आहेत. त्यांनी समस्त मानवजातीसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भरीव कार्य केले.

तसेच जलव्यवस्थापन व ऊर्जानिर्मितीसाठीचे सुद्धा योगदान दिले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!