उस्माननगर, माणिक भिसे। एकाच गावात अनेक गणपती स्थापन करून शांतता नष्ट करण्यापेक्षा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी पुढाऱ्यांनी “एक गाव एक गणपती ” हा स्तुत्य उपक्रम टिकविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील यांनी १५ऑगस्ट २००७ पासून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये समाजातील सर्व घटकातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. तेव्हा प्रत्येक गावातील समितीच्या अध्यक्षांनी , पदाधिकारी व प्रथम नागरिक म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते असे सरपंचांनी , सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्यास गावातील सर्व नागरिक एका ठिकाणी जमा होतील. अनेकांना वेगवेगळी वर्गणी कर देण्यापेक्षा एका ठिकाणी देता येईल. गणपती उत्सवामधील दारू पिणे पत्ते खेळणे अशा अवैध धंद्यांना आपोआप पावबंद बसेल. सर्व नागरिक एकत्र आल्यास जमा वर्गणीतून एखादे विधायक कार्य पार पडेल.


गावात एकच गणपती असल्याने भांडणे तंटे , किंवा लाऊड स्पीकरचा गोगाट आणि तू लहान मी मोठा असा संकुचित विचार राहणार नाही. धार्मिक कार्यात होणारे भांडणे व त्यामुळे पोलीस खात्यावर पडणारा ताण कमी होऊन पुन्हा एकदा वैचारिक , धार्मिक , विकासात्मक विषयावर कार्यक्रम होतील . म्हंटलं तो ओंकार आहे… म्हटलं तर तो निराकार आहे. अशा या निराकार गणरायाचे विविध आकार अर्थातच स्वरूपाचे आगमनाची घरातच नव्हे तर प्रत्येक गावातील प्रत्येक चौकातही अशीच जयत तयारी सुरू असल्याचे दिसून येते.


शंभर वर्षाअगोदरचा गणेश उत्सव आणि आज 2024 चा गणेश उत्सव यात गणपतीची मूर्ती स्थापना होणार एवढेच साम्य शिल्लक राहिले आहे. गजाननाची काही ठिकाणीच फक्त श्रद्धा शिल्लक आहे. तर काही ठिकाणी गजानन हायटेक झालेला आहे. गणरायाचे विविध रूपात दर्शन घडत आहे. मग माझ्या घरचा गणपती किंवा तुझ्या घरचा गणपती कसा होऊ शकतो तो आपल्या सर्वांचा झाला पाहिजे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सवाची परंपरा चालू केली की , जेणेकरून सर्वजण एकत्र आले पाहिजे. सर्वांचा गणपती होण्याकरिता अगोदर वार्डावार्डात गणेश स्थापना करणे सोडावे लागेल .

गणेश स्थापनेला विरोध नाही परंतु परमेश्वरांचे तुकडे करण्याला हा विरोध शहराबरोबर ग्रामीण भागातील मंडळाचे गणेश उत्सवाचे खर्चावर नजर टाकली तर विदर्भातील , महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात.? लाखो रुपये उंचावर खर्च करण्यात येतात 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या घरातील बालकांच्या मदती करीता तोगडी रक्कम आपल्या समाजातून का जमा होऊ शकत नाही ? अशा नानाविधि पैशाच्या समस्या या उत्सवाचा अनाथाय खर्च बाजूला ठेवून पूर्ण करता येतील. परंतु असे घडत नाही. कारण देव बसवावा त्यांची अकरा , नऊ दहा दिवस पूजा आर्चा करावी.
रात्रंदिवस त्यांच्याजवळ कामे सोडून बसवावे. त्यालाच नवस करावा आणि शेवटी पाण्यात टाकून द्यावा अशी आपली पद्धत श्रध्देला विरोध नको आहे. परंतु अंधश्रद्धेला विरोध करायलाच पाहिजे. घराघरात देव बसला तरी देवच तो आपल्या सर्वांचा बाप. .. परंतु त्यालाचा आपण आपल्या बापाचं करून टाकल्याने काय ? देव पावणार आहे . उत्सवाचा अर्थ असतो जनसामान्यांनी एकत्र यावे , जातीभेद, उच्चनीचता हा दूर व्हावा , या निमित्ताने चांगले कार्य घडावे , सदर कार्याचे लोकार्पण व्हावे , या करिता उत्सवाची मुहूर्तमेढ , परंतु सारं विपरीत घडत आहे .
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली ती लोकांच्या एकत्रित करण्यासाठी परंतु दिवस बदलत गेले आणि देवही आपापल्या भक्तांच्या घरी आला. आज आवश्यकता आहे ती महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच यांनी एकत्र बसून गावागावात एक गाव एक गणपतीची श्रद्धा ही जपल्या जातील सामाजिक एकोपा निर्माण होईल सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित केल्या गेला तर या कार्यक्रमाला व्यापक स्वरूपही येईल सामाजिक एकता साधता येईल . हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार स्थानिक पुढारी , सरपंच , तंटामुक्त गाव समितीने घ्यावे अशी काळाची गरज निर्माण झाली आहे.


