हिमायतनगर| शहरातील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती. शहरातील 80/90 युवक, जेष्ठाची हिंदू वैकुंठधाम समिती दोन वर्षापूर्वी गठीत केली. त्यांनी समाजहित उपक्रमातून दोन वर्षात चेहराच बदलून टाकला आहे. आठवड्यातून एक दिवस रविवारला दिड तास श्रमदान करतात तरुण, जेष्ठ तर दररोज 6 ते 7 या वेळात वामनराव मिराशे वडगावकर राबतात. या स्मशानभूमीचा कायापालट समिती सदस्यांनी केला असून, यासाठी लोकवर्गीणी समितीने गोळा केली आहे. त्याचा हिशोब चोख ठेवला आहे.
स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी युवकांनी स्मीता स्थापन करून मृत्यूनंतर प्रेताची अवहेलना टाळण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी प्रथम जमिन सपाटीकरण करुन 1100 ब्रासकाळी माती टाकून स्मशान भूमीतील जागा सरळ केल्या गेली. त्यानंतर दहन सफाई व स्ट्रक्चर नुतनीकरण करण्यात आले. परमेश्वर मंदीर ट्रस्टकडून महादेवमुर्ती स्थापना आठ बाय आठच्या ओट्यावर झाली. स्मशानभूमीत येण्याजाण्यासाठी माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून 15 लाखाचा सी.सी. रोड व बोअरवेलचे पाणी उपलब्ध करुन दिले गेले. स्मशानभूमी बाहेरील भिंतीलगत जागेवर तार फिनिशिंग करुन मोठे वृक्षारोपन करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा याविचाराने समिती मधील सदस्याच्या वाढदिवसा निमित्य व मिञाच्या वाढ दिवसानिमित्य दोन वर्षात 450 वृक्ष लावून जगविली आहेत. त्यासाठी ठिंबकची व्यावस्था देखील करण्यात आली आहे.
मयत माणसाच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशी कावळ्याची कमतरता भासू नये म्हणून कावळा पगंत निरतंर चालू करण्यात आली आहे. या कावळ्याच्या अन्नाची व्यवस्था समितीतील सदस्यांनी दिवस वाटून घेतले आहेत. माणूस मयत झालेल्या घरी पाच तासात भोजन व्यावस्था मोफत केली जाते आहे. गेट समोरील डिपी स्थलांतरीत करून येथे येणाऱ्या वाहनांची अडचण दूर झाली आहे. विजेच्या सुविधेसाठी 14 पोल टाकून केबल द्बारे वीज उपलब्ध करण्यासाठी वामनराव पाटील वडगावकर यांनी पाठपुरावा केल्याने हे काम पूर्नत्वस गेले आहे.
लाकडोबा चौकातील हिंदू वैकुंठधाम समितीला मोठी कमान परमेश्वर मंदीर कमेटीकडून दानस्वरुपात देण्यात आली आहे. मयताच्या अंगावर टाकलेल्या पैशातून ही 30/40 टक्के कामे करण्यात आली आहेत. हिंदू स्मशानभूमीला मोठे गेट तयार करण्यात आले असून, कै. चंपतराव पुंजाजी वानखेडे खरुसकर यांच्या स्मरणार्थ खरुसकर परिवारांनी दान दिले आहे. भविष्यात वैकुंठरथ व सरण जळतन व पुजेचे साहित्य देण्याचा माणस येथील स्मशान भूमी समितीचा आहे. डेटबाॅडी प्रिजर व्यावस्था बुकिंग झाल्याची माहिती समिती सदस्य वामनराव पाटील वडगावकर यांनी दिली आहे.