नवीन नांदेड l लोकांची उपजीविका करणारा अन्नदाते म्हणून राशन दुकानदार तळागळातील माणसा पर्यंत पोहोचण्याचे काम करत असतो, सरकार कडून वेळेवर अन्न धान्य वेळेवर न पोहचले तरी जनतेकडून रोशाला सामोरे जातो यावेळी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मागण्या संदर्भात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मागण्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड आयोजित रास्त भाव धान्य दुकानदारांच्या जिल्हा मेळावा व नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्कार समारंभ 25 जानेवारी रोजी वासवी माता कन्याका परमेश्वरी भवन सिडको येथे जिल्हा मेळावा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,लेबर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे व जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार अशोकराव चव्हाण यांच्या यावेळी उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनिल कुलकर्णी यांनी तर संघटनेची भूमिकेचा माध्यमातून जिल्हा अध्यक्ष अशोक एडके यांनी रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या सोडविण्या साठी पुढाकार घेण्याची विनंती केली, यावेळी करोना काळात रास्त धान्य दुकानदार यांनी वाटप केलेल्या अन्न धान्य कमिशन अद्यापही शासनाने दिले नसल्याचे सांगुन साध्या तक्रारी वरून बंद असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार बदल ही भुमिका मांडली.

यावेळी सुत्रसंचलन व आभार मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर या रास्त धान्य दुकानदार जिल्हा मेळावा साठी नांदेड जिल्हा दुकानदार संघटना पदाधिकारी तालुका स्तरावरून मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा मेळावा यशस्वी साठी सादीक मरखेलकर, गंगाराम पाटील,शाहुराज गायकवाड, अशोक गायकवाड, उध्दव राजेगोरे, प्रल्हाद चव्हाण, तुळशिराम चावरे, सुरेश कराड, नागोराव सुर्वे, चपंतराव कवळे,आनंता देवकते, व जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
