हदगांव, शेख चांदपाशा| शासकीय योजनेच्या15 लाखा पर्यंत मंजूर निधीतील नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, सभागृह, वर्ग खोल्या यासारखी कामे ग्रामपंचायत यंत्रणेला लावून करायची मुभा शासनाकडून प्राप्त झाली आहे. हदगांव नगर परिषद मध्ये पण प्रशासकीयराज असल्याने काही ठराविक ठिकाणीच जिथे मणुष्यवस्ती नाही मात्र, रोड नालीची काम राजकीय दबाव खाली करत असून, आवश्यक नसलेल्या ठिकाणी देखील न. पा. प्रशासन कामाला मंजुरी देत आहे. ज्यामुळे शासनाच्या निधीचा जिथे अवश्यक आहे तिथे उपयोग केला जात नाही. केवळ कंत्राटदारांचा फायदा कसा..? होईल हा उद्देश डोळया समोर ठेवून विकास कामाचे नियोजन (Poor development works in Hadgaon ) अंदाजपत्रक बनविण्यात येत असल्याची गंभीर बाब असुन विद्यमान आमदार यांनी जस जनता दरबार मध्ये घोषणा केली. त्या प्रमाणे अमलबजावणी होने आवश्यक असल्याच मत अनेक नागरिकांनी व्यक्त करत आहेत. त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांनी दाद तरी कुठे मागावी असा सवाल नागरिक करतांना दिसून येत आहेत.

शहर व तालुक्यात सुरु असलेल्या विकास कामावर कुठल्याही बांधकामाचा अनुभव वा शिक्षण नसतांनाही ग्राम पंचायत व नगर पालिकेत आता पदाधिकारी, राजकिय पक्षाचे कार्यकर्त्यांकडून दसऱ्या कत्राटदारच्या नावे कामे करण्यात येत आहे. ही कामे करताना इस्टीमेटचा आधार न घेता अतिशय निकृष्ट व अनियमित कामे होत असल्याने अल्पावधीत ही विकास कामे मोडकडीस आल्याचे दिसून येत आहे.

या कामांवर लाखो रुपये खर्च करून एक प्रकारे शासकीय निधी खर्च करण्याच घाटच सुरु आहे. त्यामुळे ही काम करणारे कार्यकर्ते, ठेकेदार, सबंधित अधिकारी, अभियंते आर्थिकतेने गब्बर झाल्याचे दिसत आहेत. निकृष्ट कामाच्या बाबतीत ग्रामस्थांकडून किवा शहरवासीया कडून तक्रार वा चौकशीची मागणी प्रशासकीय अधिकार्याकडे केली तर त्याची योग्य चौकशी व कुठली ही कारवाई न होता. त्याकडे मुद्दाम
डोळेझाक होत असून, जिथे नवीन काम सुरु आहे. तिथे कामाचे फलक लावण्याचे शासनाचे आदेश बाबत पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम नगरपरिषदला इथल्या सामाजिक कार्यकत्याला अनेक वेळा पत्र देवून ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी साधी दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

परिणाम स्वरूप शासनाच्या निधीचा हवा तसा उपयोग होऊन जनतेला गुणवत्तापूर्ण दर्जेदार कामाची अपेक्षा विकास काम विनाअनुभवी बांधकामासबंधी बहुसंख्य शैक्षणिक पात्रता नसलेल्या राजकीय पुढारी, कार्यकर्ते वा ग्रामपंचायत यंत्रणेद्वारे न करता बांधकामाचे अभियांत्रिकी शैक्षणिक अर्हता धारकांकडून करण्यात यावे. सबंधित प्रशासनातील अधिकारी, अभियंते यांच्या देखरेखीखाली ईस्टीमेट प्रमाणे करण्यात येऊन ही विकास कामे निकृष्ट न होता गुणवत्तापूर्ण दर्जेदार व्हावी व शासकिय निधीचा अपव्यय थांबावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

हदगांव तालुक्यात ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, रोह्यो योजना वा इतर योजनेतून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. सबंधित बांधकामे निकृष्ट व अयोग्य साहित्यांचा वापर यातून ठेकेदार वसबंधीत अधिकारी, अभियंते यांच्यात आर्थिक लालसेपोटी साठगाठ असल्याने मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. शासकिय निधी अर्धेच खर्च करून बाकी निधी सपाट करण्याचे काम होत असल्याचे निदर्शनात येत आहेत. शासकीय निधीचा अपव्यय थांबविण्यास दोषी ठेकेदार व अभियंते यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.
सदरील फोटो मधील सिमेंट रोड हा हदगाव शहरातील मुख्य प्रवेश रोड वरील काही आठवड्यापूर्वीच ह्याच काम पूर्ण झाले असताना आता सगळं धुरळा उडत आहे. यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना याचा खूप त्रास होत आहे.