नवीन नांदेड। मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको मोढा प्रकल्प गोदावरी हातमाग सोसायटी मधील मलनिसारण लाईन तूबलेली, दुर्गंधी युक्त पाण्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून साचलेल्या पाण्यामुळे किटक, विषारी किडे, साप परिसरात आढळत असून तात्काळ मलनिसारण लाईन साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या गोदावरी हातमाग सोसायटी सर्वे न 50 मधील भूखंड नंबर 37 ते 43 डबल मलनि :सारण लाईन गेल्या अनेक दिवसांपासून भरली असल्याने दुरंगधी युक्त पाणी परिसरात पसरल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी उघडे ड्रेनेज झाकण उघडेच असल्याने छाकणे टाकावे, व मलनिसारण लाईन त्वरीत जेट मशिन व्दारे साफसफाई करावी, बाबत तक्रारी करूनही संबंधित विभाग दुलक्ष केले आहे.


पावसाळ्यात पावसाचे व दुरंगधी युक्त पाण्याने परिसराला वेडा घातला असून तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी बी.एन.मोरे , एस.बी.मोरे ,वानखेडे,मिडेवार जि.एन यांच्या सह परिसरातील नागरिकांनी केली असून मागणी दखल घेत मनपा बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांनी पाहणी करून जेट मशिन व्दारे मलनिसारण लाईन साफ सफाई करून देण्याचे आश्वासन दिले आहे.




