लोहा| दररोज रुग्ण तपासणी त्याच्या समस्या त्यावर उपचार या रुटिंग कामाच्या प्रचंड व्यवस्थेतून वेळ काढत लोह्याचे भूमीपुत्र प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद धोंडे हे गेल्या नऊ वर्षा पासून अखंडपणे जिल्ह्याच्या व लगतच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जाळीसह वृक्ष लागवड करत असतात. यंदाचे दहावे वर्ष असून लोह्यात श्रीराम मंदिरात रविवारी (२९ जून) रोजी डॉ. धोंडे दाम्पत्य यांनी वृक्षारोपण केले. झाडांची देखभाल व्यवस्थित करावी. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ धोंडे यांनी केले


लोह्याचे भूमीपुत्र डॉ प्रमोद धोंडे ,डॉ मयुरा धोंडे या दाम्पत्याने गेल्या नऊ वर्षा पासून पावसाळ्याच्या आरंभी वृक्षारोपण करत असतात. वडील वीरभद्रअप्पा धोंडे, आई अरूणाताई यांचीन प्रेरणा असा सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा देत असते. असे नमूद करत डॉ धोंडे यांनी वृक्षारोपण त्याचे संवर्धन या मागील भूमिका स्पष्ट केली.आता पर्यंत २ हजार ५०० झाडांची लागवड केली .आणि त्यातील जवळपास जगली आहेत होत असलेले संवर्धन पाहून आपणास आनंद वाटतो असे डॉ धोंडे यांनी आवर्जून सांगितले.

वीरभद्र व अरुणाताई धोंडे या दाम्पत्याने आपले मुले डॉक्टर केली लोह्यात नव्वदीच्या दशकात त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले. मुले व सुना नातवंडे असे एकत्रित कुटुंब त्याचे आहे. आजच्या विभक्त कौटुंबिक विचारधारेत धोंडे दाम्पत्याने पाल्यांत रुजविलेले संस्कार आजच्या नव्या पिढीला एक प्रेरणा देणारे आहे.

गाडगेबाबा कॉलनी येथील श्रीराम मंदिरात वडील वीरभद्र आपा धोंडे, आई अरुणाताई धोंडे, तसेच मेंदूविकार तज्ज्ञ डॉ प्रमोद धोंडे डॉ म्युरा धोंडे हे डॉक्टर दाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष भास्कर पाटील पवार यांनी या वृक्षांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. डॉ.सुनील शिंदे, डॉ.गजानन पवार, घोरबाड, लक्ष्मीकांत कदम,सुनील कदम,गणेश मोरे,गणेश पवार,पांडुरंग लोंढे याची उपस्थिती होती.
