Dr. Dhonde : मेंदूविकार तज्ज्ञ डॉ धोंडे यांनी केले नऊ वर्षा पासून २ हजार ५०० झाडांची लागवड व संवर्धन
लोहा| दररोज रुग्ण तपासणी त्याच्या समस्या त्यावर उपचार या रुटिंग कामाच्या प्रचंड व्यवस्थेतून वेळ काढत लोह्याचे भूमीपुत्र प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद धोंडे हे गेल्या नऊ वर्षा पासून अखंडपणे जिल्ह्याच्या व लगतच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जाळीसह वृक्ष लागवड करत असतात. यंदाचे दहावे वर्ष असून लोह्यात श्रीराम मंदिरात रविवारी (२९ जून) रोजी डॉ. धोंडे दाम्पत्य यांनी वृक्षारोपण केले. झाडांची देखभाल व्यवस्थित करावी. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ धोंडे यांनी केले
लोह्याचे भूमीपुत्र डॉ प्रमोद धोंडे ,डॉ मयुरा धोंडे या दाम्पत्याने गेल्या नऊ वर्षा पासून पावसाळ्याच्या आरंभी वृक्षारोपण करत असतात. वडील वीरभद्रअप्पा धोंडे, आई अरूणाताई यांचीन प्रेरणा असा सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा देत असते. असे नमूद करत डॉ धोंडे यांनी वृक्षारोपण त्याचे संवर्धन या मागील भूमिका स्पष्ट केली.आता प...
