किनवट, परमेश्वर पेशवे| हवामानाचा अंदाज घेऊन खरीपांच्या पीकाला रासायनिक खतांची मात्रा देण्याची शेतकर्यांची लगभग चालू झाल्याचा व्यापार्यांनी रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई करुन जादा दराने विक्रीवर सपाटा लावला आहे. नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकार्यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांची व्यापारी लुटमार करीत आहेत.


किनवट कृषी विभागाचे ना बैठे पथक-ना भरारी पथक. आता शेतकर्यांना कोणीच वाली राहिला नाही. व्यापारी धार्जिण्या कृषी विभागाच्या कामकाजाची चौकशी करुन कृत्रीम खत टंचाई प्रकरणी कारवाई करण्याची संतप्त शेतकर्यांनी मागणी केली आहे. तात्काळ हालचाली न केल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे.


पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी रासायनिक खतांसाठी भटकंती करतांना पहायला मिळतो. शेतकर्यांची गरज लक्षात घेऊन व्यापार्यांनी युरिया खतांसह मिश्र खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करुन छुप्या मार्गाने २००-३०० रुपये जादा दराने विक्री करीत असल्याचे वृत्त आहे. पावती मात्र एमआरपी प्रमाणे दिली जाते. आज युरिया खताची आवश्यकता असतांना टंचाई निर्माण केली आहे. शेतकर्यांना आता किमान युरियाची आवश्यकता आहे. नाममात्र मात्रा का होईना पीकाला द्यावा लागणार आहे. युरिया खताची मात्रा न दिल्यास पीकाच्या उत्पादनावर त्याचा अनिष्ठ परिनाम जाणवणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली.


मागणी नुसार खतांचा पुरवठा झाला काय ? शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार साठेबाजी केलेल्या दुकानची आणि साठेबाजी केलेल्या गोदाऊनची रेकार्डनुसार तपासणी करण्यात यावी. बैठे पथक तैनात केलेत काय ? भरारी पथक अस्तित्वात आहेत का ? शेतकरी अडचणीत असतांना कृत्रीम टंचाई करुन लुटमार केली जात असेल तर शेतकरी वर्तुळातून उद्रेक होणार नाही कां ? शेतकर्यांची परिस्थिती ओळखून त्यापुर्वीच तात्काळ प्रभावाने कृषी विभागाने पाऊल ऊचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणने आहे. खताची मागणी आणि पुरवठा याची समिक्षा करायला हवी. शिवाय शेतकर्यांच्या खताची व्यवस्था करायला हवी असल्याचे मुद्दा शेतकर्यांनी उपस्थित केलाय. मुळात शेतकर्यांनीही युरिया खताचा वापर अगदी मर्यादेत करावा कारण जमिनिची पोत उतरत असते. युरियामुळे अनेक धोके असल्याचे तज्ञांचे मत होते. म्हणून कदाचित पुरवठा लिमिटेड असावा असाही अनुमान लावला जात आहे.



