नांदेड| फिर्यादीस व त्याचे परिवारास जिवे मारण्याची धमकी देवुन २० लक्ष रुप्याच्या खंडणीची मागणी केलेवरुन स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी एका आरोपास एक Oppo कंपनीचा चोरीचा मोबाईल, एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व एक खंजर असा एकुण रु. ५०,०००/- चा मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे. आरोपी अवतारसिंघ प्रतापसिंघ सिकलकर वय ३४ वर्ष व्यवसाय यास गुन्हयात अटक करण्याची उत्कृष्ट कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण गु.र.नं. ११७७/२०२४ कलम ३०८(२), ३५१(२), ३५१(३) भा. न्या. सं. या खंडणीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, रथा. गु. शा. नांदेड यांनी सहा. पोलीस निरीक्षक, व्हि. एच. घोगरे यांचे पथकाला सदर आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. यातील आरोपी नामे अवतारसिंघ पिता प्रतापसिंघ सिकलकर वय ३४ वर्ष व्यवसाय रिलींग काम रा. न्यायनगर जवळ, लातुर रोड, वसरणी, नांदेड ता. जि. नांदेड याने दि.०३.१२.२०२४ रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील गुरनं गु.र.नं. ११७६/२०२४ कलम ३०९ (४) भा. न्या. सं मधील फिर्यादी नामे सुनिल ज्ञानेश्वर धोतरे वय-२४ वर्षे रा. वसरणी ता. जि. नांदेड याचा मोबाईल खंजर दाखवुन जबरदस्ती काढुन घेतला.
त्यानंतर आरोपीने चोरी केलेले मोबाईलवरुन पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं ११७७/२०२४ कलम ३०८(२), ३५१(२), ३५१ (३) भा.न्या.सं.२०२३ मधील फिर्यादीस त्यास व त्याचे परिवारास जिवे मारण्याची धमकी देवुन २०,०००००/- (वीस लाख रुपये) रुपये खंडणीची मागणी केलेवरुन नमुद प्रमाणे पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दि.२५.१२.२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला असुन दिनांक २५/१२/२०२४ रोजी सहा. पोलीस निरीक्षक, व्हि. एच. घोगरे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाचे आत गोपनिय बातमीदार यांचेकडुन माहिती हस्तगत करुन, त्यांचे पथकातील अंमलदार यांचेसह भगवान बाबा चौक, नांदेड येथुन आरोपी नामे अवतारसिंघ पिता प्रतापसिंघ सिकलकर वय ३४ वर्ष व्यवसाय रिलींग काम रा. न्यायनगर जवळ, लातुर रोड, वसरणी, नांदेड ता. जि. नांदेड ह. मु. बाबा दिपसिंघ डेऱ्याच्या पाठीमागे, सितलामाता मंदिर जवळ, जुना कौठा, नांदेड यास ताब्यात घेवुन, त्याचेकडुन खंडणीचे गुन्हयात वापरलेला चोरीचा मोबाईल, एक मोटार सायकल व एक खंजर असा एकुण रु. ५०,०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे. हि अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकार, इतवारा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, व्हि. एच. घोगरे, सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, मारोती चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, सायबर सेल, नांदेड, हजजिंदरसिंघ चावला, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, नांदेड, पोलीस अंमलदार तानाजी येळगे, देवा चव्हाण, राजीव बोधगीरे, साहेबराव कदम, इसराईल शेख, अनिल बिरादार, मोतीराम पवार व अकबर पठाण व सायबर सेल येथील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी केली आहे.