नांदेड/कंधार| येथील महीलेच्या खुनातील आरोपीच्या शोध घेताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे वय ४७ वर्ष व्यवसाय शेती रा. दिग्रस (बु) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खून केल्याचे कबुल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने हि कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २४/१२/२०२४ रोजी १३.०० ते १९.३० वाजताचे सुमारास मौजे दिग्रस (बु) ता. कंधार शिवारात महीला नामे सौ. सुरेखा वैजनाथ शिंदे वय ४० वर्ष रा. दिग्रस (बु) ता. कंधार हिचा कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी खुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे कंधार येथे गुरनं. ४३६/२०२४ कलम १०३ भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार, पोलीस निरीक्षक कंधार व स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्यावरुन त्यांनी घटनास्थळी भेट देवुन पो. स्टे. कंधारचे पोलीस अधिकारी व अमंलदार व पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड हे स्वतः व स्थागुशाचे वेगवेगळे दोन पथक तयार करुन नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे चालु होते.
दिनांक २६/१२/२०२४ रोजी पोलीस ठाणे कंधार हधीत पेट्रोलिंग करुन माहीती काढत स्थागुशाचे पथकांने मौजे दिग्रस येथील परीसरात गोपनीय बातमीदार नेमुन माहीती घेतली असता, एक संशयीत इसम मयत महीलेचा पाठलाग करत असल्याची माहीती मिळाल्याने सदर इसमाबाबत गोपनीय बातमीदारांना विचारपुस करुन माहीती घेतली. सादर महीलेचा खुन करणारा आरोपी हा मौजे दिग्रस येथील असुन त्याचे नाव ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे असे असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन नमुद इसमास स्थागुशाचे पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले.
मयत महीलेने आरोपीचे बायकोला फुस लावुन त्याचेसोबत राहु दिले नाही. त्यामुळे आरोपीची बायको मागील सहा वर्षापासुन त्याचेसोबत राहत नाही. यास कारणीभुत मयत महीला असल्याचा राग मनात धरुन नमुद आरोपीने मयत महीलेचा खुन केला असल्याचे आरोपीने सांगीतले आहे. मिळुन आलेल्या आरोपीस पोलीस ठाणे कंधार गुरनं ४३६/२०२४ कलम १०३ भा. न्या. सं. या गुन्हयाचे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. वरील कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, अश्विनी जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सुधाकर खजे, सहा. पोलीस निरीक्षक, पो. स्टे. कंधार,विकास कोकाटे, सहा पोलीस निरीक्षक, पो. स्टे. कंधार, आनंद बिचेवार, पोलीस उप निरीक्षक, स्थागुशा नांदेड, मिलिंद सोनकांबळे, पोलीस उप निरीक्षक, स्थागुशा नांदेड, माधव केंद्रे, ग्रेपोउपनि, स्थागुशा, नांदेड, पोलीस अमलंदार पोहेकों/प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ/ रवि बामणे, पोना/ संजिव जिंकलवाड, पोना / विठ्ठल शेळके, पोकॉ/ विश्वनाथ पवार, पोकॉ/मोतीराम पवार, पोकों/चंद्रकांत स्वामी, पोकॉ/राहुल लाटकर, पोकॉ/बालाजी यादगीरवाड, मारोती मोरे, चापोकॉ हेमंत बिचकेवार, चापोह दादाराव श्रीरामे ने. स्थागुशा, नांदेड, पोहेकॉ/ राजु सिटीकर, दिपक ओढणे सायबर सेल नांदेड यांनी केली आहे.