The accused in the crime of forcible theft : जबरी चोरी व खंडणीचे गुन्हयातील आरोपीस चोरीचे मोबाईलसह घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL
नांदेड| फिर्यादीस व त्याचे परिवारास जिवे मारण्याची धमकी देवुन २० लक्ष रुप्याच्या खंडणीची मागणी केलेवरुन स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी एका आरोपास एक Oppo कंपनीचा चोरीचा मोबाईल, एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व एक खंजर असा एकुण रु. ५०,०००/- चा मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे. आरोपी अवतारसिंघ प्रतापसिंघ सिकलकर वय ३४ वर्ष व्यवसाय यास गुन्हयात अटक करण्याची उत्कृष्ट कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण गु.र.नं. ११७७/२०२४ कलम ३०८(२), ३५१(२), ३५१(३) भा. न्या. सं. या खंडणीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, रथा. गु. शा. नांदेड यांनी सहा. पोलीस निरीक्षक, व्हि. एच. घोगरे यांचे पथ...
