नांदेडसोशल वर्क

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

नवीन नांदेड l महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा नवीन नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती शाळेत साजरी करण्यात आली, कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे क्रीडा शिक्षक सुभाष पवार हे होते.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रा.सुहास इंगेवाड यांनी उपस्थिती लावली, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मरीबा कांबळे हे होते, या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थींनीनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला,प्रा.सुनील पवार यांनीही मनोगत व्यक्त केले,मरीबा कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन करताना, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी शोषित व पिडीत समाजांच्या व्यथा आपल्या लेखनातून मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले.

दिड दिवस शाळा शिकून हजारो वर्षांचा व्यवस्थेचा अन्यायकारक इतिहास अण्णाभाऊनी मांडल्याचे सांगितले,
फकिरा कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित केल्याचे सांगितले ,तर सुभाष पवार यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्य यासंबंधीची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमाला रमेश भत्ते,एस.व्ही. पवार,  भालके,केंद्रे,वट्टमवार,प्रा.लोनवडे,काळवणे,भीसे मॅडम,अंबुलगेकर मॅडम, साबळे, बी.एस.पवार, शेख, वानोळे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी यांची उपस्थिती होती, सुंदर फलक लेखन कला शिक्षक आर.के.बनसोडे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.चव्हाण यांनी केले तर आभार शिवराज ओगले यांनी मानले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!