नांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

Cement container overturned : टेंभी – खडकी फाट्यामध्ये भरधाव वाहनाला साईड देताना सिमेंटचा कंटेनर उलटला

हिमायतनगर| चंद्रपूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असली तरी अनेक ठिकाणच्या फाट्यावर संबंधित विभागाने स्पीडब्रेकर आणि डिव्हायडर बनविले नसल्याने दिवसगणीक अनेक अपघात होत आहेत. आत्तापर्यंत अपघाह्तात अनेकांनी जीव गमावला आहे. आणखी एक अपघात दिनांक ३१ में रोज शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला असून, यात कंटेनर चालक बालंबाल बचावला आहे.

501058597 695628509893668 8295072294446825346 n Cement container overturned : टेंभी - खडकी फाट्यामध्ये भरधाव वाहनाला साईड देताना सिमेंटचा कंटेनर उलटला

भोकर हिमायतनगर रस्त्यावर रात्री केटीसी कंपनीची सिमेंटची मोठी गाडी AP39 -Y0366 ही जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाला साईड देताना नियंत्र सुटून पलटी झाला आहे. हि घटना दिनांक ३१ में रोजी घडली असून, सदर कंटेनर टेंभी फाट्यापासून जवळपास 100 फूट रोडच्या खाली घासून येत जागेवर पलटी झाला आहे. हा प्रकार हिमायतनगर येथून गावाकडे जात असताना सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी पलटी झालेल्या कंटेनरखाली कैबिनमधून चालकाला बाहेर काढून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून चालक बालंबाल बचावला आहे.

501464349 695628539893665 864875878539098154 n Cement container overturned : टेंभी - खडकी फाट्यामध्ये भरधाव वाहनाला साईड देताना सिमेंटचा कंटेनर उलटला

हा अपघात बघून सामाजिक कार्यकर्ता हैरान झाला असून, त्यांनी सर्व वाहनधारक मित्रांना रस्त्यावर गाडी चालवत असताना आवाहन केलं कि, समोरून विट भट्टीच्या गाड्या आणि हे ट्रक येत असले तर आपले वहाण काळजीपूर्व चालवावे. आणि समोरून येणाऱ्या वाहनावर जास्त भरवसा न करता गाडी सांभाळून चालवुन स्वतःची काळजी घ्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने होत असलेल्या अपघाताची दखल घेऊन या मार्गावर सर्वच फाट्यानजीक स्पीड ब्रेकर लावून प्रत्येक फाटा आणि गावानजीक डिव्हायडर बनवून भविष्यात होणारे अपघात टाळावे अशी मागणी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!