भोकर| आज दि 31 मे 2025 रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर सर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मा.डॉ. संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील सर, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज ” जागतिक तंबाखू विरोधी दिन ” साजरा करण्यात आला. या वर्षाचे घोष वाक्य ” अपील उघड करणे तंबाखू आणि निकोटीन उत्पादनावरील उद्योग धोरणे उघड करणे ” हे घोषवाक्य आहे.


यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. मायादेवी नरवाडे यांनी रुग्णांना तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली आणि उपस्थित रुग्णांची मौखिक तपासणी केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी, डॉ.कारत्या रेड्डी मॅडम, डॉ. विजया किनीकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,इंचार्ज सिस्टर श्रीमती राजश्री ब्राम्हणे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, एनसीडी समुपदेशक भालेराव, रेणुका भिसे, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, योगेश योगी, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, दिनेश लोट ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
