World No Tobacco Day : ” जागतिक तंबाखू विरोधी दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा
भोकर| आज दि 31 मे 2025 रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर सर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मा.डॉ. संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील सर, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज " जागतिक तंबाखू विरोधी दिन " साजरा करण्यात आला. या वर्षाचे घोष वाक्य " अपील उघड करणे तंबाखू आणि निकोटीन उत्पादनावरील उद्योग धोरणे उघड करणे " हे घोषवाक्य आहे.
यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. मायादेवी नरवाडे यांनी रुग्णांना तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली आणि उपस्थित रुग्णांची मौखिक तपासणी के...
