Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL

भोकर, गंगाधर पडवळे| आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्वच पक्ष आपापल्या परीनं निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. येथील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित गृहीत धरला जात असून विरोधी पक्ष असलेला म्हविकासआघाडी कडून अनेकांनी गुडघ्याला बासिंग बांधले आहे. परंतु येथील सोशीत, वंचित, गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे कोणासच काही घेणे देणे नसल्याचे आजवरच्या राजकारणावरून दिसून येत असल्यामुळे मला येथून निवडणूक लढवायची आहे. असे प्रतिपादन एका खासगी पत्रकार परिषदेत केले.


मी गेली सतार अठरा वर्षांपासून घरा दाराचा त्याग करून फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याच्या उद्देशातून मी आजवर भारतभर भ्रमण केल असून त्यावेळी मी गोरगरिबांच्या समस्या जवळून पाहिल्यात म्हणून मला माझ्या मतदार संघातील मूलभूत गरजा अजूनही बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिल्याने अनेकजण कामासाठी मोठया शहरात, बाहेर राज्यात लहान सहान लेकरं सोडून जातात तर काहीजण शिक्षण सोडून, गावाकडे म्हातारे आईवडील सोडून जातात त्याचबरोबर शिक्षणाचा ही वनवा तसाच आहे, शेतकऱ्यांना बारमाही पिकांसाठी पाणी नाही तसे पाहता आजवरच्या राजकारणात या मतदारसंघाने निवडून दिलेल्या उमेदवारास देशाच्या राजकारणात पाठविले दोन वेळा राज्याच्या चाव्या हाती दिल्या होत्या यावढेच काय तर ज्यांना दोन वेळा मुख्यमंत्री,केल त्यांनी ही आजवर वरील अनुशेष भरून सर्वसामान्य नागरिकांच्या येथील मतदारांच्या गरजा पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून मी या माझ्या जन्म भूमितील मतदार संघातून यावर्षीची विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.

याआधी गोरसेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देशातील 23 राज्य एक शेजारील नेपाळ सारखा देश फिरलो असून राष्ट्रीय अध्यक्ष राहिलो आहे.समाजकारणातून राजकारणात येतांना धर्म निरपेक्ष पार्टी म्हणून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार म्हणून उमेदवारी मागणारे अविवाहित राहत एक व्रतस्थ समाजसेवक म्हणून आज घडीला अरुण भाऊ चव्हाण यांच्या कडे पहिल्या जात आहे.


मी भूमिपुत्र भोकर विधानसभा मतदार संघातील चिदगिरी ता.भोकर तेथील एक तांड्यात राहणारा अविवाहित समाजसेवक असून मला सामाजिक समस्यांची इत्यांभूत जाण असल्याने सर्वसामान्य माणूस मुलभूत विकासापासून कोसो दूर असल्याचे मला अभ्यासातून जवळून पाहता आले आहे.त्यांच्या समस्या केवळ सामाजिक कार्यातून सुटणाऱ्या नसल्याने राजकीय सत्तेत सहभागी होणे गरजेचे आहे.म्हणूनच सर्वसामान्यांच्या मुलभूत विकासाठी मी राजकारणात आल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने मला आगामी विधानसभा निवडणुकीत ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी जनतेचा सेवक होऊन सर्व समस्या, कामे, विकास इमान इतबारे करेन असा निर्धार, शपथ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार अरुण उर्फ अरविंद दिगंबर चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

अरुण चव्हाण सारखे ब्रम्हचारी, सेवाधारी, गरीब कुटूंबातील एक उच्च शिक्षित समाज सेवेचे व्रत्त हाती घेऊन गौर सेनेते काम करतांना लक्षात आलेल्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे भोकर विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.त्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की,फिरत असतांना अनेकांच्या अनेक समस्या अजूनही जैसे थे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षा झाले तरीही माझ्या जन्मगावी जे की भोकर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य माणूस मुलभूत विकासापासून कोसो दूर असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.सर्व जाती,पंथ, धर्मातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मतदार संघातील तीन्ही तालुक्यात उच्च शिक्षणासाठी, व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालये नसल्या कारणाने पुढील शिक्षण घेण्यासाठी नांदेड व अन्य ठिकाणी जावे लागते.ही बाब गोरगरिब व होतकरू विद्यार्थीयांना परवडणारी नसल्याने आजवर असंख्य उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.तर त्या गरिब व होतकरू सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा कोणताही मोठा उद्योग किंवा रोजगार येथे उपलब्ध झालेला नाही. एम.आय. डी.सी.आहे,परंतू अद्याप तरी येथे एकही मोठा उद्योग किंवा कारखाना उभारण्यात आलेला नाही.एकमेव भाऊराव सहकारी साखर कारखाना आहे,परंतू तो एका बड्या राजकीय नेत्याच्या अधिपत्याखाली असल्याने तो कारखाना सुशिक्षित बेरोजगार किंवा शेतकऱ्यांच्या ही उपयोगाचा नाही.
तसेच या मतदार संघात ऊस,केळी,हळद,कापूस, सोयाबीन यांसारखे शेती उत्पन्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.परंतू त्या शेतीमालाला योग्य हमी भाव येथे मिळत नाही किंवा या शेती उत्पनावर प्रक्रिया करणारा मोठा कारखाना,उद्योग नाही व मोठ्या बाजारपेठेत तो माल पाठविण्यासाठी बाजारपेठ ही उपलब्ध नाही.मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था ही नाही.यामुळे येथील शेतकरी मुलभूत गरजांपासून वंचित आहे.एकूणच असे की,येथील उपरोक्त घटकांसह सर्वसामान्य माणूस त्याच्या मुलभूत विकासापासून कोसो दूर व वंचित राहिलेला आहे.यांच्या मुलभूत विकासाचा अनुशेष भरुन काढणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे कर्तव्य एक निस्वार्थ माणूसच प्रामाणिकपणे करु शकतो.यासाठी राजकीय सत्तेत सहभागी होणे ही गरजेचे आहे.म्हणूनच माझी सामासेवी भुमिका सोबत घेऊन राजकीय क्षेत्रात मी आलो आहे.अविवाहित राहून अख्खी हयात जनसेवा करण्याचे मी व्रत्त हाती घेतलो आहे.मी एक अविवाहित व्यक्ती असल्याने राजकीय क्षेत्रात येऊन ‘अर्थकारण’ करण्यात माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही व जनसेवेसाठी मी २४ तास उपलब्ध होऊ शकतो आणि सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्न मी सोडवू शकतो.या निस्वार्थ सेवा भावानेच मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केलो आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे ‘सेक्युलर’ विचार धारेचे असल्याने सर्व धर्मातील वंचितांचे प्रश्न ते सोडवू शकतात,असे माझे मत असून मतदार संघातील बंजारा समाज आणि इतर सर्व समाजातील बहुसंख्य मतदार बांधव माझ्या पाठीशी आशिर्वादरुपाने उभे आहेत.या बळावर व विश्वासावरच मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे भोकर विधानसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली असून मला उमेदवारी दिल्यास मी नक्कीच विजयी होईल व सर्व सामान्यांचे मुलभूत प्रश्न सोडविन, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



