Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL
भोकर, गंगाधर पडवळे| आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्वच पक्ष आपापल्या परीनं निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. येथील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित गृहीत धरला जात असून विरोधी पक्ष असलेला म्हविकासआघाडी कडून अनेकांनी गुडघ्याला बासिंग बांधले आहे. परंतु येथील सोशीत, वंचित, गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे कोणासच काही घेणे देणे नसल्याचे आजवरच्या राजकारणावरून दिसून येत असल्यामुळे मला येथून निवडणूक लढवायची आहे. असे प्रतिपादन एका खासगी पत्रकार परिषदेत केले.
मी गेली सतार अठरा वर्षांपासून घरा दाराचा त्याग करून फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याच्या उद्देशातून मी आजवर भारतभर भ्रमण केल असून त्यावेळी मी गोरगरिबांच्या समस्या जवळून पाहिल्यात म्हणून मला माझ्या मतदार संघातील मूलभूत गरजा अजूनही बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिल्याने अनेकजण कामासाठी मोठया शहरात, बाहेर राज्यात...
